नेक्‍स्‍टवेव्‍हच्‍या संस्‍थापकांचा प्रतिष्ठित फोर्ब्‍स इंडिया ३० अंडर ३० पुरस्‍कारासह सन्‍मान

द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्‍या कॉलेजमधील विद्यार्थ्‍यांना सक्षम करण्‍यासाठीच्या कामगिरीची दखल

    21-Feb-2024
Total Views | 42
 Nextwave
 
 
मुंबई: भारतातील एडटेक व अपस्किलिंग प्लॅटफॉर्म नेक्‍स्‍टवेव्‍हने उत्तम कामगिरी केली आहे, जेथे व्‍यासपीठाचे सह-संस्‍थापक शशांक रेड्डी गुज्‍जुला आणि अनुपम पेडर्ला यांना फोर्ब्‍स ३० अंडर ३० पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले आहे. या प्रतिष्ठित सन्‍मानामधून द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्‍या इंजीनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्‍यांना सक्षम करत भारतातील टेक होरिझोन ४.० ला चालना देण्‍याप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते. हा पुरस्‍कार ३० प्रमुखांना उद्योगांमधील त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय कामगिरीसाठी प्रशंसित करतो. गेल्‍या वर्षी प्लॅटफॉर्मने २७५ कोटी रूपयांचा उल्‍लेखनीय सिरीज ए निधी संपादित केल्‍यानंतर हे उल्‍लेखनीय यश मिळाले आहे.
 
हा सन्‍मान उच्‍च स्‍पर्धात्‍मक स्थितीमधून मिळाला असल्‍यामुळे विशेषत: उल्‍लेखनीय आहे, जेथे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्‍ट्री अँड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी) ने देशभरातील ५५०० हून अधिक मान्‍यताकृत एडटेक स्‍टार्टअप्‍सची नोंदणी केली. शैक्षणिक श्रेणीमधील एकमेव प्रतिनिधी म्‍हणून नेक्‍स्‍टवेव्हच्‍या सह-संस्‍थापकांच्‍या निवडीमधून क्षेत्राप्रती त्‍यांचे व्‍यापक योगदान दिसून येते.
 
नेक्‍स्‍टवेव्‍हचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनुपम पेडर्ला म्‍हणाले, ''तरूण आपल्‍या देशाची ताकद आहेत. त्‍यांना योग्‍य कौशल्‍यांसह सुसज्‍ज केल्‍यास ते भारताला जागतिक अग्रणी देश बनवू शकतात. आमचा देशाच्‍या कानाकोपऱ्यापर्यंत जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिक्षण देण्‍याचा मनसुबा आहे. आमचा दृढ विश्‍वास आहे की, प्रत्‍येक विद्यार्थ्‍यामध्‍ये व्‍यापक क्षमता आहे आणि योग्‍य मार्गदर्शनासह ते अविश्‍वसनीय यश संपादित करू शकतात. आमच्‍या नेक्‍स्‍टवेव्‍ह विद्यार्थ्‍यांनी वेळोवेळी ही बाब सिद्ध करून दाखवली आहे. फोर्ब्‍सकडून या सन्‍मानामधून नेक्‍स्‍टवेव्‍ह हजारो तरूणांच्‍या जीवनात घडवून आणत असलेला आमूलाग्र बदल सार्थ ठरतो.''
 
नेक्‍स्‍टवेव्‍हचे सह-संस्‍थापक आणि कस्‍टमर एक्‍स्‍पेरिअन्‍सचे प्रमुख शशांक रेड्डी गुज्‍जुला म्‍हणाले, ''हा सन्‍मान फक्‍त वैयक्तिक यश नसून त्‍यामधून नेक्‍स्‍टवेव्ह टीमची, तसेच उत्तम करिअर घडवण्‍यासाठी सतत मोठी स्‍वप्‍ने पाहण्‍यासोबत शिक्षण घेणाऱ्या आमच्‍या विद्यार्थ्‍यांची अथक मेहनत दिसून येते. असे सन्‍मान आम्‍हाला तरूणांना तंत्रज्ञान क्षेत्रातील व्‍यापक संधींसाठी सुसज्‍ज करण्‍याच्‍या आमच्‍या ध्‍येयाला पूर्ण करण्‍यास अधिक प्रेरित करतात.''
 
अग्रलेख
जरुर वाचा
शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा ३५० वा शाहिदी आणि गुरुगोविंद सिंगजी यांचे ३५० वा गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात नांदेड, नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला...

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

'मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी अधिकृत इरादापत्रेप्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. हे इरादापत्र प्रदान समारंभ आज शनिवार, दि. १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121