शिवजयंतीच्या निमित्ताने रितेश देशमुखने केली 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा!

अजय-अतुल यांचे संगीत, संतोष सिवन यांचे छायाचित्रण असलेला द्विभाषिक ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा चित्रपट

    19-Feb-2024
Total Views | 47

Ritesh Deshmukh


मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांनी रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' या चित्रपटाची घोषणा आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी केली. महत्वाची बाब म्हणजे हा ऐतहासिक पट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
 
'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेश देशमुख यांनी हाती घेतली असून जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे आणि मुंबई फिल्म कंपनीच्या जेनेलिया देशमुख असणार असून त्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ऐतिहासिक पट म्हणजे अंगावर शहारे आणणाऱ्या संगीताचा सांगीतिक अनुभव अजय अतुल यांच्याकडून प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे, तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन ह्या चित्रपटानिमीत्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.
 
दरम्यान या चित्रपटाची खास झलक शेअर करत रितेश देशमुख, म्हणाला, "इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जिचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे. शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….”राजा शिवाजी."
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक जीवनाचा आणखी एक पैलू रितेश देशमुख त्यांच्या आगामी 'राजा शिवाजी' या चित्रपटात उलगडणार असून लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल याची अपेक्षा आहे


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121