मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेची वर निकाल सुनावत आहेत. अजित पवार गट हाच मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा निकाल त्यांनी सुनावला. विधीमंडळात अजित पवार यांच्याकडे बहुमत आहे यावरुन हा निकाल देण्यात आला आहे.
राहुल नार्वेकरांनी आपल्या निकालामध्ये या पक्षफुटीला पक्षांतर्गत वाद अस म्हटल आहे. पक्षांतर्गत वाद म्हणजे कायद्याचा भंग असा होत नाही. त्याचबरोबर पक्षांतर्गत वाद म्हणजे विधीमंडळातील पक्षाची वाद ठरत नाही. असही ते पुढ म्हणाले त्यामुळे राहुल नार्वेकरांनी पुन्हा एकदा कोणतेही आमदार अपात्र होणार नाहीत असे संकेत दिले आहेत. यावर पुढील निकालाचे वाचन सुरु आहे.