“प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्याची संधी मिळणं हे माझं नशीबचं”, ‘रामायण’बद्दल रणबीरने व्यक्त केल्या भावना

    09-Dec-2024
Total Views | 41
 
ramayan
 
 
मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाची प्रेक्षक सध्या आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण, या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार असून माता सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाबद्दल आणि यात विविध भूमिका साकारणाऱ्या कलाकारांबद्दल चर्चा सुरु होती. आणि आता या चित्रपटातील विशेष भूमिकेबद्दल पहिल्यांदाच व्यक्त होत रणबीर म्हणाला की, 'रामायण' मधील भूमिका हा माझा ड्रीम रोल होता”.
 
रणबीर कपूरने जेद्दाह येथे झालेल्या रेड सी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी 'रामायण' चित्रपटाविषयी तो म्हणाला की, "माझं सध्या रामायण चित्रपटाचं काम सुरु आहे. ही एक सर्वात श्रेष्ठ पौराणिक कथा आहे. माझा लहानपणीचा मित्र नमित मल्होत्रा खूप मन लावून हा चित्रपट करत आहे आणि नितेश तिवारी दिग्दर्शन करत आहेत. त्यामुळे मी या चित्रपटाचा भाग असणं हे माझ्यासाठी ड्रीम रोल सारखंच आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाचं चित्रिकरण पूर्ण झालं असून लवकरच दुसऱ्या भागाचं चित्रिकरण सुरु होईल. श्रीरामाची भूमिका साकारता आली यासाठी मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. भारतीय संस्कृती काय आहे हे आपल्याला हा चित्रपट शिकवतो. त्याशिवाय कुटुंबाचं महत्व, नवरा बायकोचं नातं याविषयी आपण बरंच काही शिकतो."
 
 
 
तर दुसरीकडे डेडलाईन हॉलिवूडशी बोलताना रणबीर कपूरने 'अॅनिमल पार्क', 'ब्रह्मास्त्र २' चित्रपटाचे अपडेट दिले. तो म्हणाला की, "संदीप रेड्डी वांगा यांनी जेव्हा मला अॅनिमलची ऑफर दिली तेव्हाच हा प्रोजेक्ट तीन पार्टमध्ये असणार हे निश्चित झालं होतं. २०२७ मध्ये अॅनिमल पार्कचं शूटिंग सुरु होईल. नंतर पार्ट ३ वरही काम होईल. माझी भूमिका आणखी इंटरेस्टिंग असणार आहे कारण मी नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिकांमध्ये दिसणार आहे. "
 
तर 'ब्रह्मास्त्र २' विषयी रणबीर म्हणाला की, "पहिला भाग शिव या टायटलचा होता. तर देव हे भाग २ चं टायटल असणार आहे. याची कथा सध्या लिखाणाच्या पातळीवर असून भाग २ मध्ये पुन्हा एकदा रणबीर आलियाची कॅमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121