ISIS ला दहशतवादी संघटना म्हणू नका, मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या साकिब नाचनचे वक्तव्य
सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
04-Dec-2024
Total Views | 176
नवी दिल्ली : मुंबई येथे २००२- ०३ च्या साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणारा मास्टरमाईंड साकिब नाचनने ISIS ला दहशतवादी संघटना म्हणू नका अशी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 'आयएसआयएस'चे प्रमुख असलेले नाचन यांनी इस्लामिक स्टेट आणि इतर गटांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारी सरकारी अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. तिहार तुरूंगात बंद असलेले नाचन न्यायालयात हजर झाले. खंडपीठाने म्हटले की, आम्ही याआधी तुम्हाला अॅमिकस क्यरीद्वारे मत मांडण्याचा सल्ला दिला गेला होता. तेव्हा सुनावणीवेळी उपस्थित राहून आवश्यक बोलू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने देशामध्ये कार्यरत असलेल्या ISIS च्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला असल्याची माहिती दिली आहे. याप्रकरणातील तपास यंत्रणेने साकिब नाचनसह इतर काही जणांना अटक करण्यात आली आहे. नाचनने देशात आयएसआयएस मॉड्यूल चालवले आणि तरुणांना त्यामध्ये सामिल करून घेत ISIS सोबत एकत्र राहण्याची निष्ठा जोपासली. तसेच या व्यतिरिक्त एनआयएने हसीब जुबेर मुल्ला, काशिफ अब्दुल सत्तार बलेरे, सैफ अतीक नाचन, रेहान अशफाक सुस, शगाफ सफिक दिवकर, फिरोज दस्तगीर कुआरी यांना अटक करण्यात आली होती.