दाट धुक्यातही ट्रेन धावणार सुसाट !

भारतीय रेल्वेवर १९,७४२ फॉग पास उपकरणे स्थापित

    18-Dec-2024
Total Views | 19

fogg pass

मुंबई, दि.१७ : प्रतिनिधी 
भारतीय रेल्वेने धुक्याच्या परिस्थितीत गाड्यांना अधिक सुरळीतपणे धावण्यास मदत करण्यासाठी १९,७४२फॉग पास उपकरणे स्थापित केली आहेत. यामुळे एकूण प्रवासी सुरक्षितता वाढेल, विलंब कमी होईल आणि रेल्वे सेवा अधिक विश्वासार्ह बनतील. सोशल मीडिया साइट एक्सवरून रेल्वे मंत्रालयाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की,“भारतीय रेल्वे देशभरात धुके सुरक्षा उपकरणांच्या अंमलबजावणीमध्ये अनेक पटींनी वाढ करून सतत सुरक्षा उपायांची हमी देते”.

फॉग पास डिव्हाइस म्हणजे काय?

फॉग पास डिव्हाइस हे एक GPS-आधारित नेव्हिगेशन साधन आहे, जे ट्रेन चालकांना दाट धुक्यामध्ये मार्ग दाखविण्यात मदत करते. ड्रायव्हरला स्पीड लिमिट, लेव्हल क्रॉसिंग गेट्स आणि सिग्नल लोकेशन्स यांसारखी रिअल-टाइम माहिती मिळू शकते. ड्रायव्हरला येऊ घातलेल्या घटनांबद्दल माहिती देण्यासाठी, डिव्हाइस ऑडिओ स्वरूपात ही मार्गदर्शन करते.

फॉग पास डिव्हाइसची वैशिष्ट्ये:

सिंगल लाईन, डबल लाईन, इलेक्ट्रीफाईड तसेच नॉन इलेक्ट्रीफाईड सेक्शन सारख्या सर्व प्रकारच्या सेक्शनसाठी उपयुक्त हे यंत्र उपयुक्त आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक आणि डिझेल लोकोमोटिव्ह, EMU/MEMU/DEMU साठी योग्य, १६० किलोमीटर प्रतितासपर्यंत ट्रेनच्या वेगासाठी योग्य असून यात इंटरनल री-चार्जेबल बॅटरी १८ तासांसाठी बॅकअप आहे. हे यंत्र पोर्टेबल, आकाराने कॉम्पॅक्ट, वजनाने हलके (बॅटरीसह 1.5 किलोपेक्षा जास्त नाही) आणि मजबूत डिझाइनचे आहे. लोको पायलट त्याची ड्युटी पुन्हा सुरू झाल्यावर लोकोमोटिव्हमध्ये यंत्र सहजपणे सोबत घेऊन जाऊ शकतो. ते लोकोमोटिव्हच्या कॅब डेस्कवर सहजपणे ठेवता येते. ही एक स्वतंत्र प्रणाली आहे. धुके, पाऊस किंवा सूर्यप्रकाश यांसारख्या हवामानाच्या परिस्थितीमुळे ते प्रभावित होत नाही.
अग्रलेख
जरुर वाचा
तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121