नागपूर : अकोला विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवणाऱ्या आमदार रणधीर सावरकर ( Randhir Sawarkar ) यांची भाजपच्या मुख्य प्रतोद पदी निवड करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य प्रतोद पदासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या नावाची शिफारस विधानमंडळ सचिवालयाकडे केली होती. ११ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार भाजप हा एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के सदस्य संख्येचा निकष पूर्ण करीत असल्याने विधानसभा अध्यक्षांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली शिफारस मंजुर केली आहे.