अडीच वर्षे पूर्ण होण्याआधीच मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो : संजय शिरसाट

    16-Dec-2024
Total Views | 45
 Sanjay Shirsat

नागपूर : शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत सूचक वक्तव्य केले आहे. अडीच वर्षे पूर्ण होण्याआधीच मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

मंत्र्यांची निवड करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांना दिलेली सूचना शिरसाटांनी प्रसारमाध्यमांना सांगितली. शपथविधीनंतर शिरसाट म्हणाले, गेल्या ४० वर्षांच्या तपश्चर्येचे फळ म्हणून आज मंत्रीपद मिळाले. मी चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो. माझे काम आजवर मतदारसंघापुरते मर्यादित होते. मात्र आता संपूर्ण राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी मी गमावणार नाही. एकनाथ शिंदे म्हणालेत की सध्या तरी मंत्रीपदे अडीच वर्षांसाठीच आहेत. तुमची कामगिरी चांगली नसेल, तर तुम्हाला अडीच वर्षे पूर्ण होण्याआधीच मंत्रीपदावरून डच्चू दिला जाऊ शकतो.

जो चांगले काम करेल तो मंत्रीपदी कायम राहील. जो चांगले काम करणार नाही, त्याला डच्चू दिला जाऊ शकतो आणि इतरांना संधी दिली जाईल. हा एकनाथ शिंदे यांच्या चांगला फॉर्म्युला आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121