संजय राऊतांच्या घरात नेमकं चाललंय काय? सख्ख्या भावाची डिलीट केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत!

नेमकं काय म्हटलं पोस्टमध्ये ?

    11-Dec-2024
Total Views | 176

sandip raut
 
मुंबई : (Sandip Raut) 'नेत्यांच्या पुढे -पुढे करणाऱ्यांनाच शिवसेना उबाठा पक्षामध्ये पद दिले जाते, शिवसेना उबाठा पक्षामध्ये एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होतो' असा गंभीर आरोप संदीप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांचे सख्खे बंधू संदीप राऊत उर्फ आप्पा राऊत यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. यानंतर काही वेळातच ती डिलीट केल्याचं दिसून आले. मात्र संदीप राऊत यांनी केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. संदीप राऊत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत.
 
संदीप राऊत यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
संदीप उर्फ अप्पा राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटात एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. "अलीकडे पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पारंपारिक शिवसैनिकांपेक्षा नेत्यांच्या पुढे -पुढे करणाऱ्यांना नवं उतावीळांनाच डोक्यावर घेतलं जातंय", असे संदीप राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. ही पोस्ट संदीप राऊत यांनी थोड्यावेळेनंतर डिलीट केली होती. परंतु राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत.
 
संदीप राऊतांचा खुलासा
 
"माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले होते. त्यामुळे ही पोस्ट माझ्या अकाउंटवर दिसली. आता मी अकाउंट रिकव्हर केले असून त्या पोस्टचा माझा काही संबंध नसून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एकनिष्ठ शिवसैनिक असून कोणीही त्याचा विपर्यास करू नये", असे संदीप राऊत यांनी म्हटले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121