विदेशी पर्यटकांत ब्रिटन दुसऱ्या स्थानी; 'एक्सेल लंडन’ येथे केंद्रीय पर्यटन मंत्रालय सहभागी होणार

    05-Nov-2024
Total Views | 41
ministry of touriem partcipates excel london
 

नवी दिल्ली :     'एक्सेल लंडन’ येथील जागतिक पर्यटन बाजारमध्ये भारत सहभागी होणार आहे. दि. ०५ ते ०७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान भरणाऱ्या जागतिक पर्यटन बाजारात केंद्रीय पर्यटन मंत्रालय सहभागी होणार आहे. भारत सहभाग नोंदविताना पर्यटकांमध्ये ब्रिटनमधून येणारे पर्यटक दुसऱ्या क्रमांकावर आहेत, याकडे विशेष लक्ष वेधले आहे.


 
 
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटन बाजारासाठी ५० जणांचे पथक पाठवले असून त्या पथकात राज्य सरकारांचे, पर्यटन संस्थांचे, विमानकंपन्यांचे, हॉटेल मालकांचे प्रतिनिधी समाविष्ट असून भारताची सांस्कृतिक विविधता, पर्यटनाचे अनेक प्रकार व थक्क करून टाकणारे एकमेवाद्वितीय अनुभवांचे भांडार या जागतिक व्यासपीठावर सादर करण्याची जबाबदारी पथकावर असणार आहे.

ब्रिटनमध्ये भारतीय मूळ असलेले १९ लाख नागरिक असून जागतिक स्तरावर एक दर्जेदार पर्यटन अनुभव देणारा देश म्हणून भारताचे स्थान बळकट करणे व येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. यंदा इंडिया पॅव्हिलिअनचा प्रमुख भर विवाह पर्यटन, एमआयसीई पर्यटन व महाकुंभ मेळा यावर राहणार आहे. भारतीय विवाहसोहळ्याची झलक दाखवणारा एक मंडपही इंडिया पॅव्हिलिअनमध्ये उभारण्यात आला आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121