"आता शरद पवारांनी घरी बसावं", राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला!

    28-Nov-2024
Total Views | 198
 
vikhe patil
  
अहिल्यानगर : (Radhakrishna Vikhe Patil) मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील गुरुवार २८ नोव्हेंबरपासून आपल्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यांनी अहिल्यानगरमधील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांसहीत मविआला खडेबोल सुनावले.
 
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
 
शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावं, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. शरद पवार यांनी लोकांचे वाटोळे केले. तसेच त्यांनी आता जनता आणि राज्याचं आणखी वाटोळं करु नये, असेही विखे-पाटील यांनी म्हटले.
 
निवडणुकीत मविआला घवघवीत यश मिळाले, महायुतीची पिछेहाट झाली होती. त्यावेळी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त का केली नाही ? ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी राजीनामा द्यायला हवा होता. निवडणूक नाकारायला हवी होती. जनमत बाजूने असलं की ईव्हीएम चांगलं आणि विरोधात गेलं की ईव्हीएम वाईट असे विरोधकांचे धोरण असल्याचं म्हणत विखे पाटलांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर टीका केली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप?

कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप?

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सवाल कुर्ल्यातील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान उभं राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का?” असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121