छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. मळणीयंत्रात केस अडकून एका महिलेचा मृत्यू झाला. गुरुवार दि. १४ नोव्हेंबर या दिवशी सिल्लोड तालुक्यातील वसई येथे ही घटना घडली आहे. कोकिळाबाई संजय गवळी असे या मृत महिलेचे नाव आहे. मका मशीनमध्ये मका टाकत असताना अचानक त्या मशीनमध्ये डोक्याचे केस अडकले यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या, आणि त्यांचे शिर धडावेगळे झाले. कोकिळाबाई संजय गवळी ( Kokilabai gawli ) असे या मृत महिलेचे नाव आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गवळी कुटुंबावर दुःखचा डोंगरच कोसळला आहे.
वसई गावातील फकीरराव सनान्से यांच्या शेतामध्ये मका काढणीचे काम सुरु होते. दुपारची वेळ होती. कोकिळाबाई गवळीसह इतर महिला देखील तेथे काम करीत होत्या. मका मशीनमध्ये टाकत असताना अचानक कोकिळाबाई यांचे केस त्या मशीनमध्ये अडकले. यामुळे त्या वेगाने मका मशीनमध्ये ओढल्या गेल्या. त्यांचे शिर हे त्या मशीनमध्ये गेले आणि धडापासून वेगळे झाले. या घटनेने मजुर महिलांना मोठा धक्का बसला आहे.
कोकिळाबाई यांची घरची परिस्थिती तशी बेताची आहे. त्यामुळे कोकिळाबाई व त्यांचा नवरा संजय गवळी हे दोघेही मजुरी करुन पोट भरत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. मुलगा नुकताच नोकरीला लागला आहे. घरात आनंदाचे वातावरण होते, परंतु कोकिळाबाईंसोबत घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.