मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार!; पहा व्हिडीओत नेमकं काय म्हटलंय!

    14-Nov-2024
Total Views | 54
maratha reservation video


मुंबई :     राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून लवकरच याकरिता मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. यातच राज्यातल्या विविध राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचारसभा घेण्यात येत असून आश्वासनांची घोषणा यावेळी करण्यात येत आहे. यातमराठा आरक्षणाचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आरक्षणांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून खोटे आरोप करण्यात आले. मुख्यमंत्री पदावर असताना फडणवीसांनी मराठा आरक्षणाकरिता विधेयक पास केले. यात आरोपांच्या फैरी झडल्यानंतर एका व्हिडीओच्या माध्यमातून मराठा आरक्षणासंबंधी नवा खुलासा समोर आला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९४ साली एक जीआर पास केला होता. याच जीआरच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याचा खुलासा या व्हिडीओतून करण्यात आला आहे. राज्याचे तत्कालीन प्रधान सचिव शंकर मेनन यांनी स्वाक्षरी केलेल्या जीआरमध्ये अनुसूचित जातीमधील बौध्द समाजाला १३ टक्के, अनुसूचित जमाती ७ टक्के, भटक्या जाती व विमुक्त जमाती ४ टक्के, इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी १० टक्के इ. मिळून एकूण ३४ टक्के आरक्षण राज्यात लागू होते.

दरम्यान, ३४ टक्के आरक्षणात १६ टक्के वाढीव आरक्षण देऊन आरक्षणाची कमाल मर्यादा ५० टक्के पूर्ण करण्यात आली. त्यानंतर २०१० साली आघाडीचे सरकार सत्तेत असताना शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण असल्याचे देखील म्हटले होते. या सगळ्या कारणांचा विचार करता आरक्षणाचे खेर मारेकरी शरद पवारच आहेत, असा खुलासा व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121