दुर्गापूजेच्या मंडपात समाजकंटकांनी महिला भाविकांशी केले गैरवर्तन

कट्टरपंथींचा उन्माद सुरूच

    07-Oct-2024
Total Views | 159

Hindu
 
बलरामपूर : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात इस्लामिक कट्टरवाद्यांच्या जमावाने दुर्गापूजेवेळी मंडपात घुसून गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. आरोपी कलीम, अरबाज, इम्रान आणि मुख्तार यांचा समावेश असून त्यांनी महिला भाविकांशी गैरवर्तन केले. यावेळी दुर्गापूजेच्या मंडपात लावलेला भगवा ध्वज फाडून दबाव आणला गेला असून ही घटना ५ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
 
प्रसारमाध्यमानुसार, ही घटना बलरामपूर जिल्ह्यात रेहरा बाजार पोलीस ठाणे हद्दीतील आहे. याप्रकरणाची गावकऱ्यांनी तक्रार केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही ते मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन करत होते. तेव्हा आरोपी कलीम, अरबाज, इम्रान आणि मुख्तार यांनी कट रचण्याचा प्रयत्न केला होता.
 
 
 
शनिवारी चार आरोपींनी दुर्गापूजेच्या मंडपात पोहोचून भगवा ध्वज फाडून नाल्यात फेकून दिला. यानंतर विजेचा खांब तोडल्याचा उन्माद करण्यात आला होता. तेव्हा जनरेटरची तार तोडण्यात आली होती आणि यामुळे भजन बंद पाडण्यात आल्याचे सांगितले. यावेळी भाविकांनी याप्रकरणात मध्यस्ती केली आणि विरोध दर्शवला तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
 
याप्रकरणी आता सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. यावेळी तक्रारीत लिहिले की, पोलिसांनी अरबाज, कलीम, इम्रान आणि मुख्तार यांच्याविरूद्ध एफआरआय दखल करण्यात आला. तेव्हा चारही आरोपींना रविवारी ६ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून याप्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर ( वय ६४ वर्ष) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे. सुनील खेडकर यांनी पुणे महानगराचे बौद्धिक प्रमुख, पुणे महानगर प्रचार प्रमुख, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळ सदस्य, भारतीय विचार साधनाचे सहकार्यवाह, मुंबई येथील सांताक्रूझ भाग सहकार्यवाह, संभाजी भागाचे बौद्धिक प्रमुख या व अशा विविध जबाबदारी सांभाळल्या. शीख संप्रदायाचा त्यांचा विशेष अभ्यास होता. ते मूळचे मुंबई चे होते. मागील तीस वर्ष पुण्यात..

मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर कार्यालयातील अर्ध्याहून अधिक जागा रिक्त शाळा संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न प्रलंबित तातडीने रिक्त जागा न भरल्यास आंदोलन - अनिल बोरनारे

मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर कार्यालयातील अर्ध्याहून अधिक जागा रिक्त शाळा संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न प्रलंबित तातडीने रिक्त जागा न भरल्यास आंदोलन - अनिल बोरनारे

मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग कार्यालयामध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिक्षण उपनिरीक्षक, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, समादेशक तसेच शिपायांच्या अर्ध्याहून अधिक जागा रिक्त असल्याने मुंबईतील संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न तसेच शासकीय योजनांचा बोजवारा उडाल्याने या जागा तातडीने भरण्यात याव्या अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121