राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा जाहिरनामा समिती जाहीर

    19-Oct-2024
Total Views | 30

NCP 
 
मुंबई : ( NCP) विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून, अध्यक्षपदी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची, तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे.
 
या जाहीरनामा समितीमधील सदस्यांमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रीस नायकवडी, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, रुपालीताई ठोंबरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष नजीब मुल्ला, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, माध्यम सल्लागार संजय मिस्कीन आदींचा समावेश आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121