कंगना रणावतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉरने दिला हिरवा कंदील; लवकरच होणार प्रदर्शित

    18-Oct-2024
Total Views | 16

kangana ranaut 
 
 
मुंबई : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या घटनेवर आधारित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट गेला अनेक काळ प्रतिक्षेत आहे. अभिनेत्री कंगना रणावत अभिनित आणि दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे बऱ्याचवेळा या चित्रपटाची घोषित केलेली प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, अखेर सेन्सॉर बोर्टाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिले असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती कंगना रणावतने दिली आहे.
 
कंगना रणावतचा 'इमर्जन्सी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. थेट मुंबई उच्च न्यायालयात वाद पोहल्यामुळे हे प्रकरण चांगलच चर्चेत आलं. दरम्यान, आता सेन्सॉरकडून हिरवा कंदील मिळाला असून काही दिवसांतच चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. कंगनाने याबद्दल सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, "आम्हाला सांगताना आनंद होतोय की, इमर्जन्सी या चित्रपटाला सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळालं आहे. आम्ही लवकरच चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करू. तुमचा संयम आणि पाठिंब्यासाठी खूप धन्यवाद".
 
 
 
कंगना रणावतची प्रमूख भूमिका असणाऱ्या इमर्जन्सी चित्रपटात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित शीख अंगरक्षकाने केलेल्या हत्येचाही उल्लेख आहे. शिरोमणी अकाली दलसह शीख समुदायाच्या अनेक संघटनांनी यामुळे चित्रपटावर आक्षेप घेतला होता. आणि म्हणून 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर जबलपूर उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. अखेर निर्मात्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत सेन्सॉर प्रमाणपत्राची मागणी केली आणि ती पुर्ण झाली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121