औरंग्याचा इतिहास अभ्यासक्रमातून बेदखल; मदरशांमध्ये शिकवले जाणार रामायण
29-Jan-2024
Total Views | 154
डेहराडून : "भारतीय मुस्लिम हे अरब नाहीत, तर ते या देशातील मूळ रहिवासी आहेत ज्यांनी धर्मांतर केले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पूर्वजांचा वारसा विसरता कामा नये. भारतीय मुस्लिमांनी उपासनेची पद्धत बदलली आहे, परंतु ते त्यांच्या पूर्वजांचा वारसा बदलू शकत नाहीत." असे विधान उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "प्रभू राम हे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे महत्त्वाचे अंग आहेत. भारतीय मुस्लिमांनी भगवान रामाचे अनुसरण केले पाहिजे." त्यासोबतच त्यांनी घोषणा केली की, उत्तराखंडमधील चार मदरशांमध्ये प्रभू श्रीरामविषयी शिकवणे सुरू केले आहे आणि नंतर हळूहळू सर्व मदरशांमध्ये ते लागू केले जाईल.
मदरशांसाठी नव्या अभ्यासक्रमांची घोषणा करताना, मदरसा बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स म्हणाले, “आपण सर्व भारतीय मुस्लिम येथील स्थानिक रहिवासी आहोत. आम्ही अरब नाही. आपण आपला धर्म, आपल्या उपासनेच्या पद्धती बदलू शकतो, परंतु आपण आपले पूर्वज बदलू शकत नाही. शादाब शम्स यांनी जाहीरपणे सांगितले की, मदरशांमध्ये शिकवणी ही औरंगजेबाबद्दल नसून प्रभू रामाबद्दल असेल, कारण भगवान राम संपूर्ण जगासाठी आदर्श आहेत."
यापूर्वी शम्स यांनी मदरशांमध्येही संस्कृत शिकवली जाणार असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात मदरसा बोर्डाचे अध्यक्ष काझमी यांनी सांगितले होते की, मदरशांमध्ये मुलांना वेदांचे ज्ञान दिले जाईल. उत्तराखंडमध्ये वक्फ बोर्डाच्या अंतर्गत ११७ मदरसे येतात.