शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा. त्याठिकाणी आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही, असा पलटवार मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केला आहे. राज ठाकरेंनी हिंदी सक्तीबाबत केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
Read More
मदरसे महाविद्यालय होतील की मदरसेच राहतील?
Waqf Amendment Bill पारित केल्यानंतर देशभारतील मुस्लिमांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. तसेच विरोधकांनी वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली. मात्र या विधेयकामुळे काही चांगल्या बाबी घडू लागल्या आहेत. मध्य प्रदेशातील पन्ना येथील अवैध जमिनीवर बांधण्यात आलेल्या मदरशांवर प्रशासनाने कारवाई करण्याआधीच हातोडा घालण्यात आला. संबंधित मदरशावर आज ना उद्या सरकारने पाडण्याचा निर्णय निश्चित केला होता.
उत्तराखंडमधील बेकायदेशीर मदरशांवर प्रशासनाने कारवाई अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत एकट्या देहरादूनमध्ये 11 बेकायदेशीर मदरसे सील करण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यात 500 हून अधिक मदरशांची ओळख पटवण्यात आली आहे, ज्यांच्यावर कारवाई करायची आहे.
madrasas उत्तराखंडमध्ये अवैध मदरशांविरोधात प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यातील देहरादूनमध्ये आतापर्यंत ११ अवैध मदरशांना कुलूपबंद करण्यात आले आहे. उत्तराखंड राज्याचा विचार केल्यास ५०० हून अधिक अवैध मदरशांवर कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे.
Madrasa उत्तर प्रदेशातील लखनऊमधील मलीहाबादमध्ये सफा पब्लिक स्कूल या सीबीएसई शाळेत इयत्ता ५ वीच्या १५ वर्षीय विद्यार्थी अल्तमस खानचा मृतदेह हा एका दोरीच्या फासाला अडकवण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांसह आता राज्य अल्पसंख्यांक कल्याण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत. या शाळेच्या अवारात अवैधपणे मदरशाचे शिक्षण दिले जात होते. आता संबंधित मदरशाचाही तपास करण्यात येणार आहे.
पुस्तके म्हणजे माणसे जोडणारी गोष्ट. शब्दांच्या माध्यमातून कागदावर उमटलेली अभिव्यक्ती, माणसाला जगायला बळ देते. पुस्तकांची नवी अनुभूती माणसाला एका वेगळ्या जगाचे दर्शन घडवते. परंतु, यासाठी मुक्त वातावरणही तितकेच महत्त्वाचे. विचार करायला लावणार्या पुस्तकांवर अविचारी माणसांनी बंदी आणली की, हुकूमशाहीचा मार्ग मोकळा होतो.
Nitesh Rane नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे असलेल्या ‘जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट’ या मदरशामध्ये येमेनमधील नागरिकाचे बेकायदेशीर वास्तव्य होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैध व्हिजा नव्हता. मात्र, त्याचे भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बँक खाते अशा प्रकारचे महत्वाचे दस्तऐवज बनवून त्याला मदरशामध्ये आश्रय देण्यात आला होता. दि. ११ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. राज्यभरातील मदरशांमध्ये असे प्रकार सुरू असल्याचा ठोस संशय व्यक्त करून मंत्री नितेश राणे यांनी
मुंबई : चेंबूर ट्रॉम्बे येथील पायलीपाडा परिसरात उभारलेल्या अवैध मदरशावर मुंबई महापालिकेने गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी तोडक कारवाई करून तो मदरसा ( Chembur Madrasa ) जमीनदोस्त केला. ’विश्व हिंदू परिषदे’च्या पाठपुराव्यामुळे या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
भारतविरोधी दहशतवादी संस्थांवर कारवाई करतानाच आता या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने सहरानपुर, शामली, मुझफ्फरनगर, या भागातील मकतब म्हणजेच छोट्या मदराशांच्या तपासणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या मदराशांना फंडींग नेमके कुठून येते याची तपासणी सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेश मधल्या एकूण ४७३ छोट्या मदराशांची तपासणी सुरू आहे.
Madrasa Education सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी मदरसा शिक्षण व्यवस्थेविरोधात (Madrasa Education) राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण आयोगाला विचारले की, त्यांनी इतर धर्मांच्या संस्थांविरोधात अशी भूमिका घेतली आहे का? त्यावेळी, उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाने मदरसा शिक्षण मंडळ आम्ही रद्द करू असे म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
( NCPCR ) राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी मदरशांना राज्य सरकारांकडून मिळणारा निधी थांबवण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्रही लिहिले आहे. आपल्या पत्रात त्यांनी आयोगाच्या एका अहवालाचाही हवाला दिला आहे.
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एका मदरशात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मौलाना अजीजुल रहमान यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अजीझुल या मदरशात मुलांना धार्मिक शिक्षण देतो. कुकर्म केल्यानंतर त्याने विद्यार्थ्याला तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी देत असे. आरोपीने विद्यार्थ्याला त्याच्या घरी नेण्याचाही प्रयत्न केला.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अकबर नगरमध्ये दि. १८ जून २०२४ रोजी रात्री बेकायदेशीररित्या बांधलेल्या मशिद, मदरसे आणि मंदिरे उद्धवस्त करण्याची कारवाई करण्यात आली. रात्री १२.३० ते ३.३० पर्यंत ८ बुलडोजरना कारवाईच्या कामात लावण्यात आले होते. हे संपुर्ण न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे. कारण याठिकाणी रिव्हर फ्रंट बांधण्यात येणार आहे. लखनऊमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लावून याबाबतची माहिती देण्यात आली आणि तेथील वाहतूकही बंद करण्यात आले आहे.
मानवी तस्करीच्या भीतीने शुक्रवार, दि. २६ एप्रिल २०२४ उत्तर प्रदेशातील अयोध्येत बसची झडती घेण्यात आली. त्यानंतर या बसमध्ये ९३ अल्पवयीन मुले आढळून आली, ज्यांचे वय ६ ते १४ वर्षे दरम्यान होते. याच बसमधील पाच मौलवींनाही पकडण्यात आले. सर्व मुले बिहारमधील अररिया जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना शिकवण्याच्या नावाखाली सहारनपूर जिल्ह्यातील एका मदरशात नेले जात होते. या मदरशांची नोंदणीही करण्यात आली नव्हती.
उत्तर प्रदेश सरकारने १६,००० हून अधिक मदरशांची मान्यता रद्द केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत हे मदरसे मदरसा बोर्डाच्या अंतर्गत चालत होते, जे उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले होते. आता या पात्र मदरशांना अन्य कोणत्या तरी मंडळाकडून मान्यता घ्यावी लागेल, अन्यथा ते बंद करण्यात येतील.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण बोर्ड कायदा २००४ ला घटनाबाह्य ठरवणाऱ्या नुकत्याच दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली आहे.सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पार्डीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर उच्च न्यायालयाचे मत प्रथमदर्शनी चुकीचे असल्याचे निरीक्षण नोंदवत स्थगिती आदेश दिला.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकतेच ’उत्तर प्रदेश बोर्ड ऑफ मदरसा शिक्षण कायदा-२००४’ रद्द करण्याचे निर्देश दिले. धर्मनिरपेक्षतेच्या मानकांवर हा कायदा खरा उतरत नसल्याचे सांगत, हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मदरशांच्या व्यवस्थापनावरही याचिकेतून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. एका विशिष्ट धर्माचेच शिक्षण देण्याचा उद्देश या मदरशांचा आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार असो वा अल्पसंख्यांक विभाग यांचा पैसा धर्मशिक्षणासाठी खर्च केला जातो.
मदरशासमोर प्रभू रामाचे भजन वाजवल्यामुळे संतप्त झालेल्या कट्टरपंथी जमावाने ऑटोचालक उमेश यादवला मारहाण केली. हल्ल्यात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. दगडफेक करून पीडितेच्या ऑटोचीही तोडफोड करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी पळून जाणाऱ्या चालकालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
उत्तर प्रदेशातील (UP) योगी सरकारच्या आदेशानंतर बेकायदेशीर मदरशांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपला अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालात १३ हजार बेकायदा मदरसे बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यातील बहुतांश मदरसे नेपाळ सीमेजवळ चालत असल्याचे आढळून आले. हे बेकायदेशीर मदरसे गेल्या दोन दशकांतच बांधण्यात आले असून ते बांधण्यासाठीचा पैसा आखाती देशांतून आल्याचेही उघड झाले आहे.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात असलेल्या देवबंद दारूल उलूमने 'गझवा-ए-हिंद'ला समर्थन करणारा फतवा जारी केला आहे. यासंदर्भात पाठवलेल्या अहवालावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे (NCPCR) अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी सहारनपूरच्या जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिल्लीत बोलावले आहे.
उत्तर प्रदेशच्या सरकारच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्यातील १३ हजार बेकायदेशीर मदरसे बंद करण्याची शिफारस केल्याचे समजते.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील बेकायदेशीर मदरशांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीने आपला अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालात १३ हजार बेकायदा मदरसे बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यातील बहुतांश मदरसे नेपाळ सीमेजवळ चालत असल्याचे आढळून आले. हे बेकायदेशीर मदरसे गेल्या दोन दशकांतच बांधण्यात आले असून ते बांधण्यासाठीचा पैसा आखाती देशांत
मलाप्पुरम लोकसभा मतदारसंघातून भाजपने केरळमधून अब्दुल सलाम यांना उमेदवारी दिली आहे. ते कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आहेत. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे अब्दुल सलीम पंतप्रधान मोदी यांच्या कार्याने प्रभावित आहेत. अब्दुल सलाम म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी देशातील अल्पसंख्याकांसाठी जेवढे काम केले तेवढे कोणी केले नाही."
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात पुन्हा एकदा योगींचा बुलडोझर फिरला आहे. लखनौ विकास प्राधिकरण (एलडीए), लखनौ महानगरपालिका आणि पोलिसांनी लखनौच्या अकबरनगरमधील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझरची कारवाई सुरू केली.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद शहरात असलेला 'दारुल उलूम मदरसा' अनेकदा वादग्रस्त फतव्यांमुळे चर्चेत आला आहे. पण, यावेळी त्यांनी भारतविरोधी फतवा काढला आहे. दारुल उलूमने आपल्या फतव्यात गझवा-ए-हिंदला मान्यता दिली आहे. या फतव्यात म्हटले आहे की, भारतावरील हल्ल्यादरम्यान जे लोक मरण पावले त्यांना महान शहीद म्हटले जाईल आणि स्वर्गात जाईल. आता नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने स्वतःहून दखल घेतली आहे आणि या फतव्याविरोधात कारवाईसाठी सहारनपूर पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात एका मदरशाच्या शिक्षकावर विद्यार्थिनींने विनयभंग आणि महिला सहकारी शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोहम्मद तहसीन असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तहसीनवर कडक कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी निदर्शने केली. मोहम्मद तहसीन विद्यार्थिनींना मदरशातील एका खोलीत नेऊन मालिश करायला लावत असे. या आरोपांच्या विरोधात मदरशाचा प्रमुख मौलवी मोहम्मद तहसीनला पाठिंबा देत आहे. मात्र, तहसीन आणि मुख्य मौलवी हे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बेकायदेशीर मशीद-मदरसा पाडल्यानंतर हिंसाचार भडकलेल्या हल्दवानी येथील बनभूलपूर पोलीस स्टेशन परिसरात आता कायमस्वरूपी पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे. ज्या ठिकाणचा मशीद-मदरसा पाडण्यात आला. त्या जागेवर आता पोलीस ठाणे बांधण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री धामी यांनी केली आहे. अशा स्थितीत पुन्हा त्या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याची संधी मिळणार नाही.
धर्मांधांनी अनधिकृत बांधकाम पाडल्याचे निमित्त करत, हल्दवानी शहर अक्षरशः पेटवले. संपूर्ण उत्तराखंड आज धुमसत असून, तेथे दंगेखोरांना दिसताक्षणीच गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘समान नागरी कायदा’ लागू केला, हेच धर्मांधांची खरे दुखणेे. त्यांचा देशातील कायदा-सुव्यवस्थेवर विश्वास नाही. ओवैसी संसदेत ‘बाबरी झिंदाबाद’ असे म्हणूनच म्हणू शकतो.
"भारतीय मुस्लिम हे अरब नाहीत, तर ते या देशातील मूळ रहिवासी आहेत ज्यांनी धर्मांतर केले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पूर्वजांचा वारसा विसरता कामा नये. भारतीय मुस्लिमांनी उपासनेची पद्धत बदलली आहे, परंतु ते त्यांच्या पूर्वजांचा वारसा बदलू शकत नाहीत." असे विधान उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी केले आहे.
अयोध्येत झालेल्या श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशभरात संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. याचीच प्रचिती उत्तराखंडमध्ये आली आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी येथील मदरशांमध्ये औरंगजेब नाही तर प्रभू श्रीराम शिकवू असे उघडपणे म्हटले आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या मदरशांमध्ये शिकणारी मुलेही आता भगवान श्रीरामाची कथा वाचतील, अशी माहिती नुकतीच त्यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड जवळच्या पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनाने हटवलं आहे. रात्री उशीरा ही कारवाई सुरु करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षेसाठी याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लॅण्ड जिहादच्या माध्यमातून गड किल्ल्यांचं इस्लामीकरण सुरु आहे, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड जवळच्या पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनाने हटवलं आहे. रात्री उशीरा ही कारवाई सुरु करण्यात आली होती. दरम्यान, सुरक्षेसाठी याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना मदरशांमध्ये शिकणाऱ्या हिंदू मुलांसह गैर-मुस्लिम मुलांची ओळख पटवण्याच्या निर्देशाचे पालन करण्यात विलंब केल्याबद्दल समन्स बजावण्यात आला आहे.
आसामच्या हिमंता बिस्वा सरकारने राज्यातील सरकारी मदतीने चालवलेले १२८१ मदरसे बंद केले आहेत आणि त्यांच्या जागी इंग्रजी शाळा सुरू केल्या आहेत. त्याबाबतचे आदेशही शासनाने जारी केले आहेत. आता या मदरशांमध्ये इस्लामिक शिक्षणाऐवजी सामान्य विषय शिकवले जाणार आहेत.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका न्यायालयाने दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी हाफिज इरफानला ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम पीडितेला भरपाई म्हणून दिली जाईल. आरोपी मदरशात मुलांना धार्मिक शिक्षण देत असे. अवघ्या ४० दिवसांत शिक्षा सुनावण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातून बलात्काराची एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका मदरशातील मौलवीनेच तब्बल ३ वर्षे अल्पवयीन मुलावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मौलवीला अटक केली आहे.
हरियाणातील नुहमध्ये विहिरीची पूजा करण्यासाठी गेलेल्या हिंदू महिलांवर मदशातून दगडफेक करण्यात आली आहे. गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली आहे. यामध्ये ८ महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
हरियाणातील नुहानमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. यावेळी विहिरीची पूजा करण्यासाठी जाणाऱ्या महिलांवर मदरशातून दगडफेक करण्यात आली. दि.१६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी उशिरा घडलेल्या या घटनेत तीन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नुहान येथील कम्युनिटी मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
उत्तराखंडमधील विविध भागात असलेल्या ३० मदरशांमध्ये गैर-मुस्लिम मुले इस्लामिक शिक्षण घेत असल्याची प्रकरण उघडकीस आले आहे. आतापर्यंत ७४९ गैर-मुस्लिम विद्यार्थ्यांची ओळख पटली असून, त्यात हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे. हे मदरसे उधम सिंह नगर, नैनिताल आणि हरिद्वार जिल्ह्यात आहेत. या संदर्भात राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने (NCPCR) उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेकडून उत्तर मागितले आहे.
आठ वर्षांपुर्वी हरवलेला चंदीगडमधील विवेक मुझफ्फरनगरमध्ये सापडला आहे. विवेकचे धर्मांतर करुन त्याला मदरशात डांबून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याचे नाव बदलून ‘मोहम्मद उमर’ असे ठेवण्यात आले. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगी सरकार मदरसा शिक्षणाच्या मुद्द्यावर करत असलेल्या कामांबाबत अनेक संघटनांकडून सकारात्मक वक्तव्ये येऊ लागली आहेत. प्रत्यक्षात मदरशांमध्ये पैसा कुठून येतो आणि कोणत्या कामासाठी पैसा पाठवला जात आहे, याची कोणतीही माहिती सरकारला मिळू शकलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश प्रशासनाने मदरशांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील विना परवाना असलेले मदरसे तातडीने बंद करण्यास सांगण्यात येत आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात गुरुवारी (१२ ऑक्टोबर २०२३) पोलिसांशी झालेल्या चकमकीत सद्दाम नावाच्या व्यक्तीला गोळ्या घालण्यात आल्या. सद्दामवर मदरशात शिकणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप आहे. जखमी सद्दामवर पोलिस कोठडीत उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात एका 13 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आहे. दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी ती मदरशासाठी घरून निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला. पीडितेच्या अंगावरचे कपडे फाटले होते. डोळे उघडे होते आणि तोंड चिखलाने भरलेले होतं.
बिहारमधील सहरसा येथील मदरशाचा हाफिज(शिक्षक) १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार करत होता. सुमारे ३ महिने त्याने मुलीवर बलात्कार केला. तसेच पीडित मुलीने कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी ही त्याने दिली होती, त्यामुळे मुलगी कोणाला काही सांगू शकत नव्हती. खूप ताप असल्याने आजीने तिला दवाखान्यात नेले असता मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. मुलीच्या जीवाला धोका होता, त्यामुळे गर्भपात करावा लागला. पोलिसांनी आरोपी मोहम्मद इम्तियाज उर्फ चुन्ना याला अटक केली आहे.
उत्तराखंडमधील नैनितालमध्ये सुरू असलेला अवैध मदरसा सील करण्यात आला आहे. जोली कोट परिसरात असलेल्या या मदरशाबाबत काही धक्कादायक खुलासे उघडकीस आले होते. त्यानंतर तेथील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. या मदरशात टाकलेल्या छाप्यात प्रशासनाला अनेक गैरप्रकारही आढळून आले. हा मदरसा २०१० पासून म्हणजेच गेल्या १३ वर्षांपासून येथे चालवला जात होता. याबाबतच्या तक्रारी जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंह यांच्याकडे आल्या होत्या.
उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील एका मदरशाच्या मौलानावर त्याच्याच अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत फरार झाल्याचा आरोप आहे. अल्पवयीन विद्यार्थीनी १५ वर्षाची आहे. दरम्यान मौलाना जुनैद आलमने तिच्याशी निकाह केल्याचे बोलले जात आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका मदरशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी आहे. मदरशात धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलवीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. बलात्कारानंतर मुलीची प्रकृती खूपच खालावली आहे. पीडितेला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिची प्रकृती खालावल्याने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. बसपा नेते आणि माजी नगरसेवक हाजी खलील अहमद यांनी सुमारे ३० कोटी रुपयांच्या महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. यानंतर तेथे मदरसा आणि मशीद बांधण्यात आली. नंतर काही दुकाने बांधून भाड्याने दिली. आता हाजी खलील अहमद यांच्याविरोधात महापालिकेने एफआयआर नोंदवला आहे. तसेच जागा रिकामी करण्याची नोटीस दिली.
आसाममधील काछारमध्ये एका मदरशात एका अल्पवयीन विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. मृत विद्यार्थ्याचा मृतदेह दि. १३ ऑगस्ट रोजी सापडला. रहमान खान असे आरोपीचे नाव असून तो याच मदरशाचा इमाम आहे. रहमान खानला पोलिसांनी अटक केली आहे. मदरशातून न सांगता बाहेर जाणे हेच हत्येचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने मदरसा सील करून तपास सुरू केला आहे.