नागपुरात लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    28-Jan-2024
Total Views |

Fadanvis


नागपूर :
जगातील सर्वात जुनी संस्कृती असलेल्या सिंधू समाजाच्या प्राचीन परंपरेची महती सर्वांपर्यत पोहोचविण्यासाठी नागपूर येथे लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ स्थापन करण्यात येईल. यासाठी जागा निश्चिती करण्यात आली असून १४० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्राप्त झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.
 
अनेक शतकाची परंपरा असलेल्या आणि सनातन संस्कृती जीवीत ठेवणाऱ्या सिंधी समाजाने कष्टाने उद्योग व्यापारात प्रगती केली आहे. फाळणीनंतर या समाजाला येणाऱ्या अडचणींची आपल्याला जाणीव असून त्यांना राज्यात मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी दिले.
 
याप्रसंगी आ. कुमार आईलानी, घनश्याम कुकरेजा, महेश सुखरामानी, विरेंद्र कुकरेजा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी सिंधी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक ॲड. डॉ. दयाराम लालवानी यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ‘वरसो न विसार’ या सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला सिंधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121