सिद्धार्थ आणि सई झळकणार एकत्र, 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित

    13-Jan-2024
Total Views | 26

shri devi prasanna 
 
मुंबई : मराठीसह हिंदी चित्रपट आणि ओटीटी वाहिनीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवणारी हरहुन्नरी अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा मराठीत वेगळ्या भूमिकेत आणि अंदाजात पाहायला मिळणार आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोबत ‘श्रीदेवी प्रसन्न’ या मराठी चित्रपटात झळकरणार असून लग्न संस्था, लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मानसिक अवस्था यातून सांगण्यात येणार आहेत.
 
सई आणि सिद्धार्थ यांनी यापुर्वी ‘क्लासमेट्स’ आणि ‘वजनदार’ या चित्रपटात एकत्रित काम केले. परंतु, चित्रपटाचे प्रमुख नायक आणि नायिका म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. तरुणाईच्या मनातल्याला लग्नाबद्दलच्या प्रश्नांभोवती ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाचे कथानक फिरते. तर या दोघांच्या घरातून त्यांच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू असून सईच्या घरचे लव्ह मॅरेजसाठी उत्सुक असतात. ‘तू अरेंज मॅरेज केलंस ना तर तुझा घटस्फोट होईल.., टक्कल पडायच्या आत लग्न करावं..’ असे काहीसे संवाद या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. अरेंजवाली लव्हस्टोरी..अशी टॅगलाइन असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडणार हे प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे.
 
विशाल मोढावे दिग्दर्शित ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर, संजय मोने, शुभांगी गोखले, पूजा वानखडे, रमाकांत डायमा, सुलभा आर्या, पल्लवी परांजपे, सिद्धार्थ महाशब्दे, समीर खांडेकर, रसिका सुनील अशी कलाकारांची फळी असणार आहे. हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121