राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याने केली पोलखोल, म्हणाले- 'हिंदुस्थानात होत नाही तेवढी लुटालूट येथे होतेय'

    06-Sep-2023
Total Views |
Rajasthan Congress news

नवी दिल्ली
: राजस्थानच्या काँग्रेस लोकसभा प्रभारी आणि गुजरात काँग्रेस नेत्यांच्या समोर एका कार्यकर्त्याने आपली व्यथा मांडली आहे. कार्यकर्ता म्हणाला की, राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही पक्षाने कार्यकर्त्यांचे ऐकले नाही. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. बहरोड, अलवर येथे झालेल्या बैठकीत गुजरात काँग्रेसचे नेते हिम्मत सिंह पटेल यांच्या पुढे स्थानिक कार्यकर्ता आपली व्यथा मांडत होता. यावेळी ते म्हणाले, आज आमची अवस्था रस्त्यावरील कुत्र्यासारखी झाली आहे. आमच्या सरकारमध्ये आमचे ऐकले जात नाही, मग आम्ही कोणासाठी काम करायचे?

बहरोडचे अपक्ष आमदार बलजीत यादव यांच्यावर आरोप करत कार्यकर्त्यांनी सांगितले की, या आमदाराने पक्ष मुळापासून उद्ध्वस्त केला आहे. परिसरातील गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. आम्ही घरी सुखरूप पोहोचू की नाही हे देखील आम्हाला माहित नाही. संपूर्ण राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने कामे करून घेतली, पण बहरोडचे आमदार स्वत:ची शाबासकी लुटत आहेत. त्यात आमदारांचा सहभाग काय? बहरोडमध्ये आमचे ऐकले नाही तर आतापासून आमचा नाश होईल. आता तुम्ही सर्वांनी विचार करावा. आमची आपणास विनंती आहे की, आता निवडणुकीला जवळपास दोन महिने शिल्लक आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्या जेणेकरून पक्ष एकजूट होऊन येत्या विधानसभेत विजयी होईल,असे ही स्थानिक कार्यकर्ता म्हणाला.

राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे न ऐकल्यास भविष्यात पक्ष संपुष्टात येईल, असे स्थानिक नेत्यांनी सांगितले. अलवरचे प्रभारी हिम्मत पटेल म्हणाले की, मला तुमच्या भावना समजतात. तुम्ही मला जे सांगितले आहे ते मी पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगेन. यासोबतच आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन व्हावे यासाठी येत्या निवडणुकीत सर्वांनी एकत्र यावे. राजस्थान सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोकांना त्यांचा लाभ मिळू शकेल. यावेळी बहरोडमधून काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी सर्वांनी शपथ घेतली.



 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121