स्वच्छता हीच सेवा मोहिमे अंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी “एक तारीख एक तास एकत्र” याचे एमएसएमई मंत्रालय करणार आयोजन

"एक तारीख एक तास एकत्र" उपक्रमासाठी २०० हून अधिक कार्यक्रम नियोजित

    29-Sep-2023
Total Views | 35

swachta hi seva


मुंबई :
स्वच्छता हीच सेवा मोहिमे अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी “एक तारीख एक तास एकत्र” उपक्रमात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा सक्रीय सहभाग असणार आहे.

एमएसएमई मंत्रालयाने “एक तारीख, एक तास, एकत्र” या उपक्रमासाठी आपल्या अखत्यारीतील संस्थांद्वारे २०० पेक्षा अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC), खादी आणि ग्रामोद्योग (KVI), COIR मंडळ, MGIRI-वर्धा आणि NIMSME-हैदराबाद तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग-विकास सुविधा कार्यालये (MSME-DFOs) त्यांच्या देशव्यापी कार्यालये, प्रशिक्षण केंद्रे यामाध्यमातून मोहिमेत सहभागी होतील.

एमएसएमई मंत्रालयाने हा उपक्रम अतिशय गांभीर्याने घेतला आहे आणि सचिव एस.सी.एल. दास या मोहिमेसाठी मंत्रालयातील विविध संस्थांमधील नोडल अधिका-यांसह आतापर्यंत झालेल्या प्रगतीचे निरीक्षण आणि पुनरावलोकन करत आहेत.

देशभर १ ऑक्टोबर २०२३ रोजी राबवल्या जाणाऱ्या संपूर्ण मोहिम आणि उपक्रमांच्या तयारीवर देखरेख ठेवण्यासाठी मंत्रालयाने संयुक्त सचिव स्तरावरील नोडल अधिकारी नियुक्त केला आहे. "कचरा मुक्त भारत" ही एसएचएस २०२३ ची संकल्पना आहे. एमएसएमई मंत्रालय १५ सप्टेंबर ते २ ऑक्‍टोबर २३ या कालावधीत प्रलंबित प्रकरणे (SCDPM) ३.० चा निपटारा आणि स्वच्छता हीच सेवा मोहिमेसाठी विशेष मोहिम राबवत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे (९७) यांचे गुरुवार, दि. ३१ जुलै रोजी देहावसान झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एम्समध्ये केले जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि १५ दिवसांपासून त्यांची तब्येत आणखी बिघडत चालली होती. वंदनीय प्रमिलताईंचे संपूर्ण जीवन अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते. कठोर परिश्रम करणाऱ्या महामेरू प्रमिलताई शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रीय विचारांशी एकरूप राहिल्या...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121