'Baramati Agro' वाचवण्यासाठी रोहित पवारांची मुंबई उच्च न्यायलयात धाव!

    29-Sep-2023
Total Views | 162
Baramati Agro update

मुंबई
: रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली आहे. तसेच येत्या ७२ तासांत प्लांट बंद करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. पण त्यानंतर बारामती अॅगोने न्यायालयात धाव घेतली. आणि आता रोहित पवारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे. बारामती अॅगोबाबत ६ ऑक्टोंबर पुढील सुनावणी होणार आहे. तसेच ६ ऑक्टोंबर पर्यत बारामती अॅगोवर कारवाई नको,असे मुंबई हायकोर्टाने सांगितले आहे.

दि. २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजता बारामती अ‍ॅग्रो कंपनीला यासंदर्भातील नोटीसदेखील देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून ही कारवाई केली असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करत या कारवाईबद्दलची माहिती दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. यावर मी काही उत्तर देऊ इच्छित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बारामती अॅग्रो कंपनी काय काम करते?

बारामती अॅग्रो लिमिटेड ही कंपनी कृषी क्षेत्रासाठी किफायतशीर उपाय पुरवते. त्यांची उत्पादने विशेषत: मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. ही उत्पादने सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य आहेत आणि शेतकरी त्यांचे पीक उत्पादन वाढवू शकतात. तसेच ही उत्पादने १०० टक्के सेंद्रिय आहेत, म्हणजे ती पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत आणि माती किंवा पिकांना हानी पोहोचवत नाहीत, असा दावा ही बारामती अॅग्रो कंपनीचा आहे. ही बारामती अॅग्रो कंपनी प्राणी आणि पोल्‍ट्री फीड मॅन्युफॅक्‍चरिंग, साखर आणि इथेनॉल मॅन्युफॅक्‍चरिंग, वीज निर्मिती, शेतीमाल, फळे आणि भाजीपाला आणि डेअरी उत्‍पादने या क्षेत्रात काम करते. पण आता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईनंतर आता बारामती अॅगोच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर दुसऱ्या बाजूला बारामती अॅगोवरील कारवाईवर उत्तर देणं शरद पवारांनी टाळलं. तर तक्रारी असतील तर चौकशी करा, असं पवारच म्हणाले होते. त्यामुळे चौकशी केली. पण आता चौकशा केल्या की राजकारण होत असल्याचं म्हणतात, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. त्यामुळे नातू आजोबा वेगवेगळं बोलतात, दुटप्पी भुमिका कशाला? असा सवाल ही मुनगंटीवार यांनी केलायं.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाची बाजू सांभाळत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला होता. पण ईडी, अर्थिक गुन्हे शाखा आणि आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीशीमुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोलल जात आहे.







अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121