"ओबीसींना शिव्या देता आणि माफीही मागत नाहीत"; जेपी नड्डांचा राहुल गांधींवर घणाघात
21-Sep-2023
Total Views | 47
नवी दिल्ली : आज राज्यसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान जेपी नड्डा यांनी राहुल गांधींना चांगलेच धारेवर धरलं. राहुल गांधींनी महिला आरक्षणात ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती. यावर जेपी नड्डा यांनी राहुल गांधींवर चांगलीच टीका केली. जेपी नड्डा म्हणाले की, "तुम्ही ओबीसींबद्दल बोलता पण ओबीसी समाजाला शिव्या देता आणि माफीही मागत नाही."
पुढे बोलताना जेपी नड्डा म्हणाले की, "महिलांना कोणत्या जागांवर आरक्षण मिळावे आणि कोणत्या जागा मिळू नयेत हे कोण ठरवणार? हे सरकार ठरवत नाही. हे न्यायिक मंडळ ठरवते, त्याला नामनिर्देशित करावे लागते. त्यामुळे जनगणना आणि सीमांकनानंतरच विधेयक लागू करण्याची घटनात्मक तरतूद आहे."
ओबीसी खासदारांबद्दल बोलताना जेपी नड्डा म्हणाले, "भारतीय जनता पक्षाने भारताला पहिला ओबीसी पंतप्रधान दिला आहे. आज २७ मंत्री ओबीसीचे आहेत. भाजपच्या ३०३ खासदारांपैकी २९ टक्के ओबीसी आहेत. हा फक्त लोकसभेचा आकडा आहे. तुम्ही ओबीसींना शिव्या देता आणि माफीही मागत नाही."