रवींद्र वायकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी; सोमय्यांचा हल्लाबोल

    05-Aug-2023
Total Views | 106
 
Kirit Somaiya
 
 
मुंबई : उद्धव ठाकरे गटाला आज (५ ऑगस्ट) दोन मोठे धक्के मिळाले आहेत. कोविड सेंटर घोटाळ्याबाबत किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता, ठाकरे गटाचे माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. सध्या वायकर हे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. याबद्दल भाजपा नेते किरीट सोमय्यांनी माहिती दिली आहे.
 
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्या विरोधात आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित बांधले आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता.
 
आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. वायकर हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात असून त्यांची चौकशी सुरू आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121