केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता!
- १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथील कार्यक्रमाला हजर राहण्याची शक्यता
31-Aug-2023
Total Views | 82
मुंबई : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगरमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहू शकतील, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैद्राबाद येथील निजामाच्या राजवटीतून तब्बल वर्षभरानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा प्रांत स्वतंत्र झाला होता. या मुक्तीसंग्राम लढ्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजी नगरमध्ये राज्य सरकारच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुक्तीसंग्राम कार्यक्रमातील संभाव्य उपस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. अमित शाह यांच्या या दौऱ्याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.