पाकिस्तानमध्येही चांद्रयान-३ चे लँडिंग दाखवा! पाकिस्तानी मंत्र्याची मागणी
23-Aug-2023
Total Views | 381
मुंबई : 'चांद्रयान-३ चे लँडिंग पाकिस्तानमध्ये दाखवण्यात यावे', अशी मागणी पाकिस्ताचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी केली आहे. फवाद चौधरी नेहमीच भारताविरोधात गरळ ओकत असतात. चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशानंतर फवाद चौधरी यांनी भारताची खिल्ली उडवली होती. पण आता ते सुधारले आहेत किंवा भारताचे सामर्थ्य ओळखले आहे असे दिसते.
त्यांनी चांद्रयान-३ मिशनच्या लँडिंगच्या आधी ट्विट केले आहे. यामध्ये ते केवळ भारताचे अभिनंदनच करत नाहीत तर भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानापुढे नतमस्तक होतानाही दिसत आहेत. पाकिस्तानचे माजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी मंगळवारी इस्त्रोतो अभिनंदन करणारे एक ट्विट केले.
ट्विट मध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'पाकिस्तानी मीडियाने उद्या संध्याकाळी ६:१५ वाजता पाकिस्तानमध्ये चांद्रयान-३ चे लँडिंग लाईव्ह दाखवावे. मानवजातीसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. विशेषत: भारतातील लोकांचे, वैज्ञानिकांचे आणि अंतराळ समुदायाचे खूप खूप अभिनंदन.