ते योगी म्हणून मी त्यांचे पाय धरले : रजनीकांत

    22-Aug-2023
Total Views |
 RAJNIKANT
 
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ते योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले. रजनीकांत योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडतनाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर अनेक लोकांनी रजनीकांत यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर रजनीकांत यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
 
रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्यातच रजनीकांत यांचा सहपत्नीक उत्तरप्रदेश दौऱ्याही माध्यमात चर्चेचा विषय ठरला होता. योगींच्या पाय पडण्यावरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रजनीकांत यांनी योगींच्या पाया पडण्यामागे आपली भूमिका स्पष्ट केली.
 
रजनीकांत म्हणाले की, "मी नेहमीच सन्यासी आणि योगी माणसांच्या पाया पडतो, योगी आदित्यनाथही मंहत आहेत त्यामुळे मी त्यांच्या पाया पडलो" रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे विरोधीपक्षनेते अखिलेश यादव यांची पण भेट घेतली. योसोबत त्यांनी रामजन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्याचाही दौरा केला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121