SSC Stenographer Recruitment 2023 : अंतिम तारीख २३ ऑगस्ट २०२३, आजच अर्ज करा

    21-Aug-2023
Total Views | 40
SSC Stenographer Recruitment 2023

मुंबई :
एसएससी अर्थात कर्मचारी निवड आयोगाच्या अंतर्गत स्टेनोग्राफर या पदांकरिता भरतीप्रक्रिया सुरु असून अर्ज मागविण्यात येत आहेत. दि. २ ऑगस्टपासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून येत्या तीन दिवसांनंतर अर्ज प्रक्रिया थांबविण्यात येणार आहे. म्हणजेच, उमेदवाराकरिता २३ ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे.

स्टेनोग्राफरच्या ग्रेड 'सी' आणि ग्रेड 'डी'च्या १२०७ रिक्त जागांसाठी एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर @ssc.nic.in अर्ज करावयाचा आहे. दरम्यान, अंतिम मुदत संपल्यानंतर २४ आणि २५ ऑगस्ट २०२३ रोजी उमेदवारास अर्जातील माहितीमध्ये दुरुस्ती करता येणार आहे.

तसेच, अर्ज करण्यासाठी उमेदवारास १०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारास परीक्षा शुल्कात सूट देण्यात आली आहे. स्टेनोग्राफर या पदासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असणे बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, एसएससी स्टेनोग्राफर संगणक आधारित परीक्षा १२ आणि १३ ऑक्टोबर २०२३ पासून आयोजित केली जाणार आहे. सर्व १२वी उत्तीर्ण उमेदवार ज्यांचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक आहे ते एसएससी स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. एसएससी स्टेनोग्राफर निवड प्रक्रिया दोन टप्प्यात विभागली आहे, म्हणजे, संगणक-आधारित परीक्षा आणि कौशल्य चाचणी. या लेखात, आम्ही एसएससी स्टेनोग्राफर २०२३ नोंदणी प्रक्रियेचे संपूर्ण तपशील अर्ज शुल्क, पात्रता आणि इतर तपशीलांसह सामायिक केले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121