बिहारमध्ये जंगलराजची वापसी! दुहेरी हत्याकांडाने हादरलं बिहार

    20-Aug-2023
Total Views |
 Begusarai
 
पाटणा : बिहारमध्ये रोज हत्याकांड होत आहेत. त्यामुळे बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बिहारमध्ये दोन दिवसांपूर्वी एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, त्यातच आता शनिवारी (१९ ऑगस्ट २०२३) दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे.
 
एकीकडे बेगुसराय येथे मॉर्निंग वॉक करत असताना एका निवृत्त शिक्षकाची रस्त्याच्या मधोमध हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. दुसरीकडे, पूर्व चंपारणमध्ये आणखी एक घटना घडली जिथे दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी एका कंत्राटदाराची गोळ्या झाडून हत्या केली.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवृत्त शिक्षकाची हत्या बेगुसरायच्या बाचवारा पोलीस स्टेशन परिसरातील फातेहा रेल्वे स्टेशनजवळ झाली. तर कंत्राटदाराची हत्या पूर्व चंपारणमधील चकिया पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर गोळी झाडून करण्यात आली. दुहेरी हत्याकांडाच्या या घटना पाहता बिहार पुन्हा एकदा जंगलराजकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
 
दोन दिवसांपूर्वी अररियामध्येही दैनिक जागरणचे पत्रकार विमल यादव यांची बदमाशांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यामुळे नितीश कुमार सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. त्याच वेळी, पूर्व चंपारण आणि बेगुसरायच्या घटनांनी 'सुशासन बाबू'च्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा
मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

म्हाडा व अदानी समूह यांच्यात प्रकल्प अंमलबजावणीसाठी करार १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेत रहिवाशांचे होणार पुनर्वसन गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अदाणी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवार,दि.७ रोजी करार करण्यात आला.म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला 'म्हाडा'चे उपाध्यक्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121