"पुरुषांचं भारीपण कुणी दाखवणार नाही", अशोक मामांचा सवाल
28-Jul-2023
Total Views | 100
2
मुंबई : केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने चार आठवड्यात ६५ कोटांच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी चित्रपट पाहात यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशात आता ज्येष्ठ अभिनेते अभिनेचा अशोक सराफ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला. पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
काय म्हणाले अशोक सराफ?
"बाईपण काय भारी आहे हे दाखवायला लोक पुढे येतील. पण, पुरुषांचं भारीपण कुणी दाखवणार नाही. पुरुषांचं भारी पण हे नकळत ठरलं जातं आणि ते फक्त जाणवून घेण्यापर्यंतच असतं. त्याचा कुणी गवगवा करत नाही कधी. स्त्रिया आपल्या मनातल्या भावभावना, दु:ख मैत्रिणींसमोर किंवा नवऱ्यासमोर व्यक्त करत असतात. पण, पुरुष मंडळी यावर कायम मौन बाळगून असतात. आपली दुःख, त्रास, आर्थिक संकटं ती कधीच कोणासमोर उलगडताना दिसत नाहीत आणि त्यावर कधीच मनमोकळेपणाने बोलत नाहीत. गप्प राहून ते या त्रासाला सामोरे जातात," असं अशोक सराफ म्हणाले.
दरम्यान, अशोक सराफ यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय़ ठरला आहे. इतकचं नाही तर स्त्रियांनाही त्यांचे हे म्हणणे पटले असून यावर आता दिग्दर्शक केदार शिंदे खोलवर विचार करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. विनोदवीर अशोक सराफ यांनी दमदार अभिनयशैलीच्या जोरावर कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कलाविश्वात त्यांना प्रचंड मान आहे.