'बाईपण भारी देवा'चा शो आज फुकटात पाहा...

    28-Jul-2023
Total Views | 131

baipan




मुंबई :
केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांचे भरभरुन कौतुक मिळवताना दिस आहे. इतकेच नव्हे तर बॉक्स ऑफिसवरही कोटींच्या घरात कमाई करताना दिसत आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपट पाहायला चित्रपटग़हात अजूनही गर्दी होत असल्यामुळे तिकीटं मिळत नसल्याने प्रेक्षकांचा हिरमोडही झालेला दिसून येत आहे. ज्यांना बाईपण भारी देवा चित्रपट अजूनही पाहायला मिळाला नाही त्यांच्यासाठी विशेष शो चे आयोजन शुक्रवार दि. २८ जुलै रोजी करण्यात आले आहे.
 
'बाईपण भारी देवा' चित्रपट आज मुंबईतील सिटीलाईट चित्रपटगृहामध्ये मोफत पाहता येणार आहे. शिवसेना प्रणित आणि शिव चित्रपट सेना आयोजित' बाई पण भारी देवा ' या चित्रपटाचा खास( मोफत)शो व कलाकारांचा, तंत्रज्ञानाचा गौरव प्रमुख मान्यवरांकडून करण्यात येणार आहे. सिटी लाईट सिनेमा, माहिम येथे शुक्रवारी संध्याकाळी वेळ ६ .३० वाजता हा खास शो असणार आहे.
 

baipan show 
 
बाईपण भारी देवाच्या आजच्या विशेष शोला महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ निलम ताई गो-हे, खासदार राहुल शेवाळे, शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के,आमदार सदा सरवणकर आमदार यामिनी ताई जाधव , आमदार डॉ मनीषा ताई कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल ताई म्हात्रे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख सौ कामिनी ताई शेवाळे ,शिवसेना उपनेत्या कला ताई शिंदे ,शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव,विभाग प्रमुख गिरीश धानुरकर ,महिला विभाग प्रमुख सौ प्रिया ताई सरवणकर, तसेच ' बाई पण भारी देवा ' या चित्रपटातील प्रमुख कलाकार ,निर्माते ,दिग्दर्शक ,सह कलाकार, तंत्रज्ञ आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. अभिनेता आणि शिवसेना सचिव शिवचित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार याने खास निमंत्रण दिले आहे. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121