“तुमच्या ‘टीम इंडिया’मध्ये कोणी मर्द…” विवेक अग्निहोत्री संतापले

    22-Jul-2023
Total Views | 58

vivek agnihotri





मुंबई :
मणिपूरमधील हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. महिलांची निर्वस्त्र धिंड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होत असताना समाज माध्यमावर आता या विषयामुळे एक वेगळाच भडका उडाला आहे. द कश्मीर फाईल्स या चित्रपटातून समाजाचे ह्रदयद्रावक सत्य घटना मांडल्यानंतर एका नेटकऱ्याने दिग्दर्शक विविक अग्निहोत्री यांना मणिपूर घटनेवर ‘द मणिपूर फाइल्स’ चित्रपट काढण्याबाबत एका नेटकऱ्याने बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना थेट आव्हान दिले आहे.
 
‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी ‘द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’चा ट्रेलर ट्विटरवरुन शेअर केला होता. या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत “वेळ वाया घालवू नका. मर्द असाल तर मणिपूर फाइल्स चित्रपट काढा,” अशी कमेंट केली. यावर अग्निहोत्रींनी उत्तर देत, “माझ्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. पण, सगळे चित्रपट माझ्याकडूनच बनवून घेणार का? तुमच्या ‘टीम इंडिया’मध्ये कोणी मर्द राहिलेला नाही का?” असे म्हटले आहे.
 
 
 
मणिपूरचे प्रकरण
 
बुधवारी रात्री (१९ जुलै) समाज माध्यमावर मणिपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात पुरुषांचा एक मोठा गट दोन महिलांची रस्त्यावरून निर्वस्त्र धिंड काढत असल्याचे दिसत होते. त्यानंतर या महिलांना एका शेताच्या दिशेने घेऊन जाताना व्हिडीओत दिसत आहे. त्या ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. ही घटना ४ मे रोजी थौबल जिल्ह्यात घडली असून, पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. १८ मे रोजी खांगपोकी जिल्ह्यात पोलिसांनी शून्य एफआयआर (शून्य एफआयआर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली, ते सोडून दुसरीकडे एफआयआर दाखल करणे) दाखल केला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, या अमानवी गुन्ह्याला दोन महिने उलटूनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. ज्या दोन महिलांवर अत्याचार करून, त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, त्या महिला कुकी-झोमी या समुदायाच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. खांगपोकी या डोंगराळ जिल्ह्यात या समुदायाचे प्राबल्य आहे. दोन महिलांपैकी एकीचे वय २०; तर दुसरीचे वय ४० असल्याचे कळते आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121