मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटाविरोधात देशातील अनेक संघटना या चित्रपटाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाला सुरक्षा प्रदान केली जावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना होत आला आहे. यातील संवाद आणि अनेक प्रसंगांमुळे चित्रपट अडचणीत सापडत गेला. हिंदुंच्या भावना दुखावल्याने चित्रपटाशी निगडित असलेल्या निर्मात्या, दिग्दर्शकांना धमक्या येऊ लागल्या. यामुळे निर्मात्यांनी कोर्टात धाव घेत चित्रपटाला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपटाविरोधात देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधील न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयाने निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या लेखकाला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु चित्रपटाच्या निर्मात्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार होती. परंतु निर्मात्यांच्या नव्या मागणीमुळे ही सुनावणी उद्या होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
काय म्हणाले न्यायाधीश?
या चित्रपटाला देशभरातून प्रेक्षकांच्या रागाचा सामना करावा लागत आहे. देशातील अनेक संघटना या चित्रपटाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाला सुरक्षा प्रदान केली जावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, आजच्या सुनावणीपूर्वी तुम्ही यासंदर्भात याचिका का दाखल केली नाही? किंवा तुमच्या याचिकेत ही बाब नमूद का केली नाही? आजच्या कामकाजाच्या यादीत या गोष्टीचा समावेश नसताना यावर आज सुनावणी होऊ शकणार नाही. या याचिकेवर उद्या सुनावणी होईल, त्यामुळे तुम्ही उद्या या.