मुंबई : आदित्य ठाकरेंचे विश्वासू राहुल कनाल यांनी आज दि. १ जुलै रोजी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. राहुल कनाल हे युवासेना कार्यकारिणी सदस्य होते. यावेळी राहुल कनाल यांनी आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश का केला याचं स्पष्टीकरण दिलं. राहुल कनाल यांचा हा पक्षप्रवेश ठाकरे पिता-पुत्रांसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
यावेळी राहुल कनाल म्हणाले, "कोव्हिड काळात ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजसेवा केली. त्याच पद्धतीने आम्ही कोविड काळात फक्त सेवा केली. मेव्याशी आमचा काहीही संबंध नव्हता. सुशांतसिंग राजूपत किंवा दिशा सालियन प्रकरणात आपल्यावर आरोप झाला. पण या प्रकरणाचा तपास सुरु करा आणि यात दोषी आढळलो तर तुमची चप्पल आणि माझं डोकं असेल." असं राहुल कनाल यांनी यावेळी सांगितलं.