इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्तीच्या पायलट प्रोजेक्ट उत्पादकांसाठी भारतात पोषक वातावरण

    03-Jun-2023
Total Views | 46
Pilot project of electronics repair India

मुंबई
: इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्तीच्या पायलट प्रोजेक्टसाठी सरकारकडून पोषक वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे उत्पादकांना इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्तीच्या पायलट प्रोजेक्टसाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होईल. तसेच, आयात आणि निर्यातीसाठी आवश्यक मंजुरीसाठी लागणारा वेळ १० दिवसांवरून कमी करण्यासाठी भारत सरकार बदलांची चाचणी घेईल. अवजड आयात-निर्यात नियम शिथिल करून इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्ती केंद्र म्हणून स्वत:ची स्थापना करण्यासाठी भारत या आठवड्यात एक पायलट प्रकल्प सुरू करेल, ज्यामुळे देशात अशा प्रकारच्या ऑपरेशन्सचा विस्तार करण्यासाठी फ्लेक्ससारख्या टेक कंपनीला आकर्षित करता येईल, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूक भारतात येण्यास मदत मिळतेय. तसेच, अॅपल आणि झियोमीसारख्या कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित केले आहे, परंतु देशात अजूनही दुरुस्ती आऊटसोर्सिंगसाठी उद्योग नाही ज्याचा अंदाज जागतिक स्तरावर शंभर अब्ज आहे. सध्या या क्षेत्रात चीन आणि मलेशियाचे वर्चस्व आहे.

दरम्यान,रिपेअर आउटसोर्सिंगमुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादकांना भारतात त्यांच्या उत्पादन क्षमतांचा आणखी विस्तार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. पुरवठा साखळी शॉकसाठी लवचिकता सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे जाफरी म्हणाले, ज्यांनी पाच वर्षांत भारतातील दुरुस्ती उद्योग २० अब्ज डॉलर इतका असेल असा अंदाज व्यक्त केला.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121