मणिपूर हिंसाचार; २४ जूनला सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन
22-Jun-2023
Total Views | 56
नवी दिल्ली : मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने २४ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २४ जून रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यामध्ये गृहमंत्री शाह हे मणिपूरमधील परिस्थिती, केंद्र सरकार व राज्य सरकारचे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देणार आहेत. मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष सरकारकडे सर्वपक्षीय बैठकीची मागणी करत होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे मणिपूरमधील परिस्थितीकडे लक्ष नसल्याचाही टिका काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे.