पुरी रथयात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवाकार्य

१,१०० स्वयंसेवकांचा सेवाकार्यात सहभाग

    21-Jun-2023
Total Views | 62
Service work of Rashtriya Swayamsevak Sangh in Puri Rath Yatra
 
भुवनेश्वर : पुरी रथयात्रेदरम्यान प्रशासकीय पातळीवर काही कमतरता असल्याचे दिसून येत असल्यास ती भरून काढण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ८ प्रकारची सेवाकार्य आपल्या हाती घेतली आहेत. यावर्षी या सेवाकार्यात पूर्ण गणवेशातील तब्बल १,१०० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला असून ते अविरतपणे कार्य करत आहेत. रथयात्रेदरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका गर्दीतून बाहेर काढण्यासाठी 500 मीटरचा 'मानवीय रस्ता' बनवण्यात आला आहे. ज्यामुळे जखमी आणि बेशुद्ध लोकांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाणे शक्य होईल. याशिवाय रुग्णालयात प्रथमोपचार, रुग्णवाहिका सेवा, स्ट्रेचर सेवा, अन्नाचे वाटप, पिण्याच्या पाण्याचे वितरण करणे, हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे, रुग्णांना मदत करणे आदी कामांमध्ये हे स्वयंसेवक व्यस्त आहेत.
 
स्वयंसेवक सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अखंड कार्यरत आहेत. प्रशासनाच्या सहकार्याने अशी अनेक कामे साधारण 2005 पासून स्वयंसेवक करत आहेत. या 8 प्रकारच्या सेवांपैकी सर्वात महत्वाची सेवा म्हणजे प्रशासनाकडून रथयात्रा मार्गावर 9 दिवस स्वच्छता केली जाते आणि स्वयंसेवक स्वतः देखील त्या कामात सहभागी होतात. भुवनेश्वर, कटक आणि ब्रह्मपूर येथील स्वयंसेवक जे पेशाने डॉक्टर आहेत ते स्वतः उपस्थित राहून प्राथमिक उपचार करत आहेत.
 
RSS
 
यात्रा सुरू होण्यापूर्वी 19 जून रोजी सायंकाळी सरस्वती बाल विद्यामंदिर (घोडा बाजार) येथे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या स्वयंसेवकांचे 8 भागांत विभागणी करून त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या. प्रांत सेवा प्रमुख शंतनू मांझी, जिल्हा कार्यवाह वामदेव नायक यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य सुरू आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ओडिशा पूर्व प्रांत प्रचारप्रमुख रवि नारायण पांडा यांनी सांगितले की, रथयात्रेतील व्यवस्थेसाठी संपूर्ण नियोजनाची जबाबदारी स्वयंसेवकांकडे सोपवण्यात आली आहे. स्वयंसेवक वेळोवेळी आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण प्रांतातील स्वयंसेवकांना कोणत्याही घटनेस सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121