मोस्ट वाँटेड दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात हत्या

    19-Jun-2023
Total Views | 271
Most Wanted Terrorist Hardeep Singh Nijjar Murder In Canada

नवी दिल्ली
: कॅनडामध्ये राहणारा खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची गुरुद्वारामध्ये हत्या करण्यात आली आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे या पंजाबबहुल शहरातील गुरु नानक शीख गुरुद्वारामध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

निज्जर भारताविरुद्ध हिंसाचार आणि विध्वंसक कारवायां मध्ये सहभागी होता. हरदीपसिंग निज्जरला भारत सरकारने मोस्ट वाँटेड घोषित केले होते. भारत सरकारच्या टॉप ४०दहशतवाद्यांच्या यादीत निज्जरचे नाव होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) २००२ साली निज्जरवर पंजाबमधील जालंधर येथे एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केल्यानंतर त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पुजाऱ्याच्या हत्येचा कट खलिस्तान टायगर फोर्सने (केटीएफ) रचला होता. यापूर्वी एनआयएने निज्जर याच्याविरुद्ध भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचल्याप्रकरणी आरोपपत्रही दाखल केले होते.

निज्जरचा भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता. कॅनडात भारताविरोधात झालेल्या अनेक हिंसक आंदोलनांमागे निज्जरचा हात होता. निज्जर खलिस्तान टायगर फोर्सच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असे आणि त्यांना भारतविरोधी हिंसाचारासाठी प्रेरित करत असे. काही अहवालांनुसार, निज्जर हा कॅनडातील आणखी एक रहिवासी मनदीप सिंगसोबत बब्बर खालसा इंटरनॅशनलचे (बीकेआय) पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्यांनी निधीचीही व्यवस्था केली होती.

पंतप्रधानांचा अमेरिका दौरा आणि आयएसआय टूलकिट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या अमेरिका दौऱ्यात अडथळा आणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय सक्रिय झाली आहे. आयएसआयने अमेरिकेत अनेक खलिस्तानी संघटनांसोबत बैठका घेतल्या आहेत. या अंतर्गत पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात त्यांना विरोध करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आणि भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी हा निषेध करण्यात आला आहे. यादरम्यान कोणत्या प्रकारचे पोस्टर वापरायचे आणि त्यावर काय लिहायचे याची तयारी करण्यात आली आहे. लोकांना आंदोलनात नेण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121