पुणे : पुण्यात मनसेने तलावात क्रिकेट खेळत हटके आंदोलन केले आहे. हे आंदोलन करण्याचे कारण म्हणजे औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्यात यावे, यासाठी मनसेने हे आंदोलन केले. त्यासाठी मनसेने नवी शक्कल लढवत तलावात क्रिकेट खेळून आंदोलन केले आहे. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. मनसेकडून हे आंदोलन करण्याकरिता स्विमिंग सूट ,गॉगल, ट्यूब वापरण्यात आले. स्विमिंग सूट ,गॉगल, ट्यूब परिधान करून तलावात क्रिकेट खेळून हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, मनसेकडून नेहमीच प्रशासनाला जाग आणण्याकरिता हटके आंदोलन करण्यात येते. यावेळी तलावात क्रिकेट खेळत जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्यात यावा यासाठी मनसेने हे आंदोलन केले. २०१७ पासून जलतरण तलाव बंद असल्याची माहिती समोर आली आहे.