अजित पवारांचा फोटो महाजनांच्या जाहिरातीत,जीवाभावाचा माणूस असा उल्लेख!

    17-May-2023
Total Views | 65
ncp-chief-sharad-pawar-and-mla-ajit-pawar-photo-on-bjp-leader-girish-mahajan-birthday-poster


मुंबई
: मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता भाजप नेते गिरिश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या जाहिरातीत अजित पवारांचा फोटो छापल्याने राज्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर सर्वांचे फोटो छोटे असून पवारांचा मोठा फोटो छापलेला आहे.पवारांच्या फोटोखाली जिवाभावाचा माणूस असे कॅप्शन देण्यात आले आहे.
 
क्रिडामंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त संजय पवार यांनी दैनिकात एक जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सुरेशदादा जैन यांचेही फोटो आहेत. पण या सर्वांच्या फोटोमध्ये अजितदादा पवार यांचा फोटो सर्वात मोठा छापण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत बंडखोरी करत जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष झालेले संजय पवार यांनी दैनिकात दिलेली जाहिरात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121