मुंबई : एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्ट समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरी सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. एनसीबीच्या रिपोर्टनंतर सीबीआयकडून ही कारवाई केली जात आहे.
सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचारादेखील गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे समीर वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.