महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    29-Apr-2023
Total Views | 96
 
Mumbai Metro
 
 
मुंबई : मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल.
 
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे तर महिलांना सुद्धा एसटी बसेसमधून ५० टक्के प्रवास सवलती दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी मला आशा आहे.
 
 
कोणाला सवलत मिळेल?
 
ही सुविधा ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. या ३ श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.
 
या सर्व सवलती मेट्रो लाइन २ ए आणि ७ च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-१ कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला ३० दिवसांची वैधता राहील. मुंबई १ कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

(Bihar election) नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले आणि देशभर भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बिहारमध्ये भाजपाप्रणित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या होत्या.ज्या यशस्वी ठरल्या. आता देखील या निकालानंतर मुंबई बाबत बोलताना 'मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर निवडून येईल',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.तर प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत..

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

(Local Body Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना, राज्यभरातील अनेक पक्षांकडून निरनिराळे निर्णय घेतले जात आहेत. (Local Body Election) अशातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. (Local Body ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121