मुंबई: अनेक वर्षांपासून शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांनी नीलम गोर्हे प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा त्यांच्या समर्थकांपैकी एकाही नेत्याने निलम गोर्हे यांची भेट घेऊन सांत्वन न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी नीलम गोर्हे यांची सांत्वनपर भेट घेतली होती. मात्र, ठाकरे परिवारातील एकही सदस्यांनी नीलम गोर्हे यांची भेट न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.