दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा

    16-Feb-2023
Total Views | 215
Important announcement for 10th-12th students

मुंबई
: फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली आहे.
 
दहावी व बारावीच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक / शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही सुविधा १५ फेब्रुवारी पासून सकाळी ९ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहील.

हेल्पलाईन क्रमांक ०२२-२७८९३७५६ आणि ०२२-२७८८१०७५ हे आहेत. कार्यालयातील हेल्पलाईनसाठी डॉ.ज्योती परिहार, सहसचिव (७७५७०८९०८७), श्रीमती गीता तोरस्कर, वरिष्ठ अधीक्षक तथा सहा.सचिव (प्र.) (७०२१३२५८७९), श्रीमती सुप्रिया मोरे, वरिष्ठ अधीक्षक (९८१९१३६१९९) आणि श्रीमती सुवर्णा तारी, वरिष्ठ अधीक्षक (९९८७१७४२२७) या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर, समुपदेशक म्हणून श्रीकांत शिनगारे – ९८६९६३४७६५, मुरलीधर मोरे- ७९७७९१९८५० / ९३२२१०५६१८, ०२२-२७८९३७५६/ ०२२-२७८८१०७५. हयाळीज बी.के.- ९४२३९४७२६६, अनिलकुमार गाढे – ९९६९०३८०२०, जाधव विकास नारायण – ९८६७८७४६२३, विनोद पन्हाळकर – ९५२७५८७७८९, संजय जाधव – ९४२२५९४८४४, चंद्रकांत ज.मुंढे – ८१६९६९९२०४, अशोक देवराम सरोदे – ९३२२५२७०७६/ ८८८८८३०१३९, श्रीमती शैलजा मुळ्ये – ९८२०६४६११५, शेख अखलाक अहमद अ.रज्जाक – ९९६७३२९३७०, श्रीमती स्नेहा अजित चव्हाण – ८३६९०१५०१३ आणि श्रीमती उज्ज्वला क.झरे – ९९२०१२५८२७ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121