आता राज्यातील घराघरांत बसवणार ‘स्मार्ट मीटर’ देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

    08-Dec-2023
Total Views | 211

smart meter 2
 
 
नागपूर : चुकीची वीजदेयके रोखण्यासाठी राज्यभरात लवकरच ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
 
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात अवास्तव घरगुती वीजदेयके आकारण्यात आल्याचा तारांकित प्रश्न आमदार विनोद निकोले यांनी सभागृहात उपस्थित केला होता. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी निकोले यांनी केली. मीटरची प्रत्यक्ष नोंद न घेता या ठिकाणी एका व्यक्तीला १ लाख रुपयांचे वीजदेयक पाठवण्यात आले. पडताळणी केली असता वीजदेयक २८ हजार रुपये असल्याचे आढळून आले. तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीला अतिरिक्त पैसे परत करण्यात आले.
 
या प्रकरणी एजन्सी देण्यात आलेल्या आस्थापनावर कारवाई करण्यात आली आहे. आणखी कुणाला वाढीव वीजदेयके देण्यात आली असतील, त्यांना रक्कम अल्प करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. राज्यात मोठ्या प्रमाणात चुकीची वीजदेयके दिली जात आहेत. वर्ष २०२२ मध्ये १४ लाख १४ हजार वीजमीटरची चुकीची देयके दिली गेली. वर्ष २०२३ मध्ये चुकीची देयके देण्याची सरासरी ७ लाखपर्यंत न्यून करण्यात यश आले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी केंद्रशासनाकडून ‘स्मार्ट मीटर’साठी अनुदान देण्यात येत आहे. महाराष्ट्रात यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
दरम्यान, आमदार आशिष जैस्वाल यांनी वीजदेयकांची रचना सर्वसामान्यांना समजेल अशी सुलभ करण्याची मागणी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची सूचना देण्याची सूचना त्यांना केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121