फोर्ब्सची शक्तीशाली महिलांची यादी जाहीर! सितारामण यांच्यासह 'या' तीन भारतीय महिलांचाही समावेश

    06-Dec-2023
Total Views | 92
 nirmla sitaraman
 
मुंबई : अमेरिकन बिझनेस मॅगझिन फोर्ब्स दरवर्षी जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध करते. यावर्षी सुद्धा फोर्ब्सने जगभरातील १०० शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. फोर्ब्सच्या या यादीत ४ भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३२ व्या स्थानावर आहेत. तर एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नादर मल्होत्रा ६० व्या क्रमांकावर आहेत.
 
फोर्ब्सने आपल्या यादीत ७० व्या क्रमांकावर स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सोमा मंडल यांना स्थान दिले आहे. तर बायोकॉनच्या संस्थापक किरण मुझुमदार-शॉ फोर्ब्सच्या यादीत ७६ व्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या या यादीत पहिला क्रमांक युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डर लेन यांनी पटकावला आहे. यानंतर युरोपीयन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्ड दुसऱ्या स्थानावर आहेत. तर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमल हॅरिस तिसऱ्या स्थानावर आहेत.
 
निर्मला सीतारामन यांना सलग पाचव्यांदा फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळाले आहे. फोर्ब्सच्या मते, त्या भारतातील सर्वात शक्तीशाली महिला आहेत. गेल्यावर्षी फोर्ब्सने आपल्या यादीत निर्मला सीतारामन यांना ३६ व्या स्थानी ठेवले होते. म्हणजेच यावेळी त्यांनी फोर्ब्सच्या यादीच चार स्थानाची झेप घेतली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121