भारत-यूएईचा संयुक्त युद्ध अभ्यास!

    31-Dec-2023
Total Views |
 India UAE
 
नवी दिल्ली : भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात संयुक्त युद्ध अभ्यास करणार आहेत. या युद्ध अभ्यासाला ‘डेझर्ट सायक्लोन’ असे नाव देण्यात आले आहे. दोन्ही देशाचे सैन्य दल २ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान राजस्थानमध्ये अभ्यास करणार आहे. भारतीय लष्कराने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून युद्ध अभ्यासाची माहिती दिली आहे. भारत आणि यूएईचे संबंध खूप जुने आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दोन्ही देश एकमेकांशी जोडलेले आहेत.
 
अलीकडच्या काळात, भारत आणि यूएईने संरक्षण प्रशिक्षण आणि संरक्षण सामग्रीचा पुरवठा या बाबतीतही एकमेकांना सहकार्य केले आहे. सप्टेंबर २००८ मध्ये, दोन्ही देशांच्या हवाई दलांनी अबू धाबी येथील अल-धाफ्रा तळावर संयुक्त सराव केला. अबुधाबी येथे दर दोन वर्षांनी आयोजित होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन (आयडीईएक्स) मध्येही भारत नियमितपणे सहभागी होत आहे. आता दोन्ही देशांचे सैन्य राजस्थानच्या थारच्या वाळवंटात एकत्र सराव करतील.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121