भाजपच्या विजयाने सिद्ध केलं "एक अकेला सब पे भारी"

    03-Dec-2023
Total Views | 142

modi
 
नवी दिल्ली: राजस्थान, मध्यप्रदेश,छत्तीसगड व तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत असतानाच केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी . "एक अकेला सबपे भारी" असं म्हणत भाजप च्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्व विरोधकांनी इंडिया आघाडी बनवून एकत्रपणे मोदींना हरवण्यासाठी प्रयत्न केले तरीही. एक मोदी सर्व विरोधकांवर भारी पडले अस विरोधकांना उद्देशून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
 
राजस्थान, मध्यप्रदेश,छत्तीसगड तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहे. जवळपास सर्व राज्यातील सत्तास्थपनेच चित्र स्पष्ट होत आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्षाला राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेश या तिन्ही राज्यात स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे.
 
राजस्थान मध्ये भाजप ११२ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगड मध्ये भाजप ५२ जागांवर तर काँग्रेस ३७ जागांवर आघाडीवर आहे. आणि मध्यप्रदेश मध्ये भाजप तब्बल १६२ जागांवर आघाडीवर आहे काँगेसला मात्र ६४ जागांवर समाधान मानावे लागल आहे. त्याचबरोबर तेलंगणा मध्येही भाजपने ९ जागांवर आघाडी घेतली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त १ जागेवर समाधान मानावे लागले होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121