प्रभासच्या 'सलार'ने शाहरुखच्या 'डंकी'ला टाकले मागे, बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास

    29-Dec-2023
Total Views | 25

dunki vs salar 
 
मुंबई : यंदाचे वर्ष मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी फार चांगले गेले. प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोटींच्या घरात कमाई केली. नुकताच शाहरुख खान याचा २०२३ मधील शेवटचा चित्रपट डंकी आणि प्रभासचा सलार चित्रपट प्रदर्शित झाला. पण अनपेक्षितपणे प्रभासच्या सलारने शाहरुखच्या डंकीला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली.
 
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'सलार' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ९०.७० कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी ५६.३५ कोटी, तिसऱ्या दिवशी ६२.५ कोटी, चौथ्या दिवशी ४६.३० कोटी, पाचव्या दिवशी २४.९० कोटी, सहाव्या दिवशी १५.१ कोटी आणि सातव्या दिवशी १३.५० कोटींचा गल्ला जमलवत एकूण कमाई ३०८.९० कोटी इतकी झाली.
 
तर, 'डंकी'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २९.२० कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी २०.१२ कोटी, तिसऱ्या दिवशी २५.६१ कोटी, चौथ्या दिवशी ३०.७० कोटी, पाचव्या दिवशी २४.३२ कोटी, सहाव्या दिवशी ११.५६ कोटी आणि सातव्या दिवशी १०.५० कोटींचा गल्ला जमवत एकूण कमाई १६१.१ कोटी कमावले.
 
इतकेच नव्हे, तर ‘सलार’ आणि ‘डंकी’ या दोन्ही चित्रपटाने जगभरात देखील उत्तम कमाई केली असली तरी या कमाईत देखील सलार वरचढ ठरला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर ‘डंकी’ने ३०५ कोटींची कमाई केली आहे. तर ‘सलार’ने ४५०.७० कोटींची कमाई केली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121